testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोहाला कन्यारत्न

मुंबई| Last Modified रविवार, 1 ऑक्टोबर 2017 (11:55 IST)
अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. सोहाने नवरात्रीत मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
सोहाची आई अर्थात अभिनेत्री शर्मिला टागोर आणि पती, अभिनेता कुणाल खेमू सोहासोबत रुग्णालयात आहेत. सोहा आणि

बाळ सुखरुप असल्याची माहिती कुणालने ट्‌विटरवरुन दिली आहे.
नवरात्रीत सोहाला कन्यारत्न प्राप्त झाल्याने पतौडी आणि खेमू कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. काहीच महिन्यांपूर्वी सोहाचा भाऊ सैफ अली खान आणि वहिनी करिना कपूरला मुलगा झाला होता. त्यामुळे छोट्या तैमूरला खेळण्यासाठी बहीण मिळाली आहे. एप्रिल महिन्यात सोहाचा बेबी बम्प दिसायला लागल्यानंतर चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर कुणालने ट्‌विटरवरुन या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. सोहा आणि कुणाल हे दोघे 25 जानेवारी, 2015 रोजी विवाहबंधनात अडकले होते.
सोहाने 2004 मध्ये “दिल मांगे मोअर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचे “रंग दे बसंती’, “साहेब बिवी और गॅंगस्टर रिटर्न्स’ यासारखे काही चित्रपट गाजले. 2016 मध्ये रिलीज झालेले “31 ऑक्‍टोबर’ आणि “घायल वन्स अगेन’ हे तिचे प्रेग्नन्सीपूर्वीचे शेवटचे चित्रपट होते.


यावर अधिक वाचा :

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..

national news
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर...

पुन्हा चर्चेत आली आएशा टाकिया

national news
बॉलिवूडमधून बर्‍याच दिवसांपासून गायब झालेली अभिनेत्री आएशा टाकिया खूप दिवसांनंतर ...

'रेस ३' सोशल मीडियावर लीक

national news
रेस ३ हा चित्रपट सोशल मीडियावर लीक झाला आहे. मल्टीस्टारर अॅक्शनपट असणाऱ्या रेस ३ चं ...

माझ्या सख्या.....

national news
अशा कशा माझ्या सख्या... कुणालाही न कळतील अशा. कुणी खूप बोलघेवडी सुसाट बोलत सुटते वेडी

‘फर्जद’ने बॉक्स ऑफिसचा गड राखला

national news
१ जूनला प्रदर्शित झाला झालेल्या ‘फर्जंद’चित्रपटा होऊन तीन आठवडे उलटले तरी या चित्रपटाची ...