मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्देवी योगायोग

बोनी कपूर यांची पहिली पत्नी आणि अभिनेता अर्जून कपूरची आई मोना शौरी-कपूर यांचा वयाच्या 48 व्या वर्षी मृत्यू झाला. याला नियतीचा खेळ म्हणता येईल किंवा दुर्देवी योगायोग, कारण मोनाना आणि श्रीदेवी या दोघांच्या मृत्यूसंदर्भात एक विचित्र साम्य आढळून आले आहे. ज्याप्रमाणे मोना यांचे आपल्या मुलाचा म्हणजेच अर्जूनचा पहिले सिनेमा पाहण्याआधीच निधन झाले त्याचप्रमाणे जान्हवीचा पहिला सिनेमा पाहण्याआधीच श्रीदेवी यांचेही आकस्मात निधन झाले.
 
अर्जून कपूरचा इश्कजादे हा पहिला सिनेमा 2012 साली मे महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र त्याआधीच म्हणजे 25 मार्च 2012 रोजी मोना यांचे निधन झाले.
 
श्रीदेवी यांच्याबद्दलही असेच काहीसे घडले. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीचा धडक हा पहिला‍वहिला सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच श्रीदेवी यांचे निधन अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.