testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्त्री चित्रपटातील सुंदर अभिनेत्रीचा तोडला होता जबडा #MeToo

Last Modified बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (08:45 IST)
सध्या हॉलिवूड प्रमाणे आपल्या बॉलिवूडमध्ये #MeToo या कॅम्पेनद्वारे काळा प्रकार समोर येतो आहे.
अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा यामध्ये फोडली आहे. सर्वात आधी
अभिनेत्री तनुश्री दत्ता, कंगना रानौत तर
आता ‘स्त्री’ या चित्रपटात ‘चुडैल’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री फ्लोरा सैनी हिचाही समावेश
झालाय. सुंदर दिसणाऱ्या फ्लोराने तिच्यावर
झालेल्या अत्याचाराबाबत आता धीराने वाचा फोडली आहे.या प्रकरणात
निर्माता गौरांग दोषी याच्यावर तिने
गंभीर आरोप केले आहेत. सोबत पुरावा म्हणून फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.फ्लोराने फेसबुकवर एक पोस्ट आणि फोटो शेअऱ केले आहेत. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, ‘हो, ही मी आहे. 2007 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्माता गौरांग दोषी याने मला मारहाण केली होती. त्यावेळी मी त्याला डेट करत होती. मारहाणीमुळे माझा जबडा तुटला होता व फ्रॅक्चर झाले. त्यामुळे आयुष्यभराचे दुखणे मिळाले. त्यावेळी मी हे सत्य अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु इंडस्ट्रीमध्ये नवीन आलेल्या मुलीवर कोणालाही विश्वास नव्हता.’ तसेच त्याने मला धमकी दिली की मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळू देणार नाही आणि खरंच तसंच झालं. अनेक चित्रपटांमधून मला बाहेर काढले गेले आहे.
असा आरोप फ्लोराने केला आहे. जर आरोपात तथ्य निघाले तर दोषीला मोठ्या कारवाईस सामोरे जावे लागेल आणि त्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते.


यावर अधिक वाचा :

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...

परिणितीची इच्छापूर्ती

national news
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण ...

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

national news
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा