Last Modified रविवार, 19 ऑगस्ट 2018 (00:55 IST)
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल जाणार्या अभिनेत्रींमध्ये अग्रगण्य असून ती सध्या तिच्या बायोपिकमुळे बरीच चर्चेत आहे. आता तर सनीची तमिळ चित्रपटातही वर्णी लागली असून ती एका योद्ध्याची भूमिका तमिळ चित्रपटात साकारणार आहे. सध्या लॉस एंजेलिसमध्ये सनी लिओनी असून यादरम्यान दिलेल्या मुलाखतीत तिने असे सांगितले की, अशी ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिला आधीपासूनच इच्छा होती. या भूमिकेसाठी मी खूपउत्सुक आहे. ती 'वीरमादेवी' या तमिळ चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन वी.सी. वदिवुदायान यांनी केले आहे. तिच्या तमिळ डेब्यूची सनीच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून तिच्या आयुष्यावर आधारित 'करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी' या वेबसिरीजलाही चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद दिला आहे.