चित्रपट परीक्षण : गोल्ड

Last Modified शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (11:37 IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये देशाचा झेंडा फडकावताना पाहणं यापेक्षा अभिमानास्पद काय असू शकतं? हीच अभिमानाची भावना 'गोल्ड' चित्रपट पाहताना मनात आणखी पक्की होईल. 1948मधील लंडन ऑलिम्पिकची ही घटना आहे. ही घटना ऐतिहासिक आहे. कारण स्वातंत्र्य मिळून एक वर्ष झालं होतं आणि भारताचा हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये खेळत होता. उत्कटता आणि उत्साहानं भरलेल्या भारतीय हॉकी संघाचा प्रवास 'गोल्ड'मध्ये दाखवला आहे.
चित्रपटाचं कथानक 1936 पासून सुरू होतं. भारतीय हॉकी संघानं बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सलग तिसर्‍यांदा सुवर्णपदक जिंकलं होतं. तेव्हा हा ब्रिटिश इंडियाचा संघ म्हणून ओळखला जायचा. त्याचं व्यवस्थापन ब्रिटिश राजवटीकडून केलं जायचं. तेव्हा संघातील एका बंगाली कनिष्ठ व्यवस्थापकानं स्वतंत्र भारताच्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा संकल्प सोडला. 1948 मध्ये भारताचा तिरंगा इंग्लंडच्या भूमीत फडकावण्याचं त्याचं स्वप्न होतं. दिग्दर्शिका रीमा कागती यांनी गहन अर्थ असलेल्या या कथेला मनोरंजक पद्धतीनं सादर केलं आहे. सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. धोतर नेसलेल्या व्यवस्थापकाच्या भूमिकेत अक्षय कुमार खूपच हसवतो पण लगेच भावनिकही होताना दाखवला आहे. कुणाल कपूरनं पहिल्यांदा हॉकीपटू आणि नंतर हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका चांगलीच वठवली आहे. विनीत कुमारचंही काम कौतुकास्पद आहे. अमित साधची भूमिकाही खूप चांगली आहे. सनी कौशलनं 'रागीट' स्वभावाच्या हॉकीपटूची भूमिका जबरदस्त साकारली आहे. 'गोल्ड' फक्त हॉकीवर आधारित चित्रपट नाही तर, एक ऐतिहासिक काळ त्यात दाखवला आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Amitabh Bachchan Health: अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, ...

Amitabh Bachchan Health: अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, त्यांच्यावर सर्जरी होईल, असे ब्लॉगमध्ये म्हटले आहे
बॉलीवूडचे 'शहेनशहा' अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि बर्‍याचदा त्यांच्या ...

आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये अजय देवगणची एंट्री ...

आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये अजय देवगणची एंट्री 22 वर्षानंतर भन्साळीसोबत शूटिंगला सुरुवात करणार आहे
बॉलीवूड चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' अभिनेता अजय ...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता 11 ते 18 ...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता 11 ते 18 मार्च दरम्यान महोत्सव पार पडणार
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा ...

किमया मराठी भाषेची !

किमया मराठी भाषेची !
असा आहे मराठी भाषेचा शृंगार !

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा
कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर ...