बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (09:19 IST)

दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये सनी लिओनीचा मेणाचा पुतळा

नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे सनी खऱ्या अर्थाने बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि विराट कोहली यांच्या पंगतीत जाऊन बसली आहे. 
 
अनावरण सोहळ्याच्या वेळी सनीने पुतळ्या शेजारी उभं राहून काही फोटो काढले. त्यावेळी त्यातील सनी कोण आणि पुतळा कोण, हे ओळखणंही कठीण झालं होतं. आपला हा पुतळा पाहून सनीचा आनंदही तिच्या चेहऱ्यावरुन झळकत होता. पुतळा पाहून आपण पुरते भारावून गेल्याचंही ती म्हणाली. पुतळा साकारण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कलाकारांची आणि त्यांच्या कलेचंही तिने तोंड भरुन कौतुक केलं. त्यासोबतच या संग्रहालयात पुतळा साकारण्यासाठी आपल्या नावाची निवड करण्यात आल्याविषयी तिने संग्रहालयाचेही आभार मानले असून, ही सन्मानाची बाब असल्याचं स्पष्ट केलं.