सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (08:40 IST)

बाप्परे, सु शांतने गुगलवर 'हे' शब्द सर्च केले होते

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतने मृत्यूपुर्वी गुगलवर काही धक्कादायक गोष्टी सर्च केल्या होत्या. याबाबतही त्यांनी माहिती दिली. सुशांतने गुगलवर “painless death”, “schizophrenia” आणि “bipolar disorder” या किवर्डला सर्च केले होते. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची माहिती दिली. 
 
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या पाच दिवस अगोदर त्यांची एक्स मॅनेजर दिशा सालियान हीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सुशांत तणावात होता. तिच्या मृत्यूचा संबंध सुशांतशी लावून खोट्यानाटे किस्से रचले जात असल्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूपुर्वी जवळपास दोन तास तो स्वतःचे नाव सर्च करत असल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले आहे. सुशांतच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये त्याने गुगलवर सर्च केलेल्या शब्दांचा खुलासा झाला आहे.
 
सुशांत मृत्यूपुर्वी त्याच्याशी संबंधित काही लेख गुगलवर शोधत होता. त्याच्याबाबत काय लिहिले जात आहे. याचा तो शोध घेत होता. यादरम्यान त्याने “painless death”, “schizophrenia” आणि “bipolar disorder” हे शब्द सर्च करुन त्याबाबत शोध घेतला होता, अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली.