बुधवार, 29 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2019 (10:03 IST)

पाहा, सुष्मिता सेनने काय सांगितले, ती काय करणार

Sushmita Sen
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसाठी एक घोषणा केली आहे. सुष्मिता सेनने एक फोटो शेअर करत सांगितले आहे की, '१० वर्षानंतर मी चित्रपटात काम करण्यास सज्ज झाली आहे. मी लवकरच पडद्यावर दिसणार आहे.' 
 
सुष्मिता सेनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लिहिले आहे की, 'संयम ठेवणाऱ्या प्रेमाचे मी नेहमीच कौतुक केले आहे. माझ्या चाहत्यांनी मला स्क्रिनवर परत येण्यासाठी १० वर्षे वाट पाहिली. मला माझ्या प्रत्येक पावलावर प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यासाठी मी परत येत आहे.  या पोस्टमुळे चाहते खूपच आनंदित झाले आहेत. चाहत्यांनी या पोस्टवर कॉमेंन्टस करत आनंद व्यक्त केला आहे.