बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

तारक मेहता का उल्टा चश्मामधले हाथी भाई गेले

लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये डॉ. हंसराज हाथीची भूमिका निभावणारे अभिनेता कवी कुमार यांचं  हद्यविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. मागील 2-3 दिवसांपासून त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याचं बोललं जात आहे. कवी कुमार आजाद यांना मीरा रोड येथील वोकहार्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण काही तासातच त्यांनी जीव सोडला. ही बातमी मिळताच फिल्म सिटीमध्ये सुरु असलेल्या शूटींग रद्द करण्यात आल्या आहेत. कवी कुमार हे खूपच मिळून मिसळून आणि आनंदी राहणारे व्यक्ती होते. आमिर खानचा सिनेमा मेला आणि फंटूशसह त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं.