शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 3 मार्च 2024 (13:15 IST)

तारक मेहता का उलटा चष्मा फेम झील मेहता अडकणार लग्न बंधनात!

zeel mehta
Instagram
तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील छोट्या सोनू भिडे चा अभिनय करणारी झील मेहता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिचा रोकाचा कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. झील मेहता बॉयफ्रेंड आदित्य दुबेशी लग्न करणार आहे. हे दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिप मध्ये होते.

तिच्या रोका सेरेमनीचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केले असून तिने लाईट ब्लु रंगाचा लेहेंगा घातला होता तर आदित्यने तिच्या ड्रेसला मॅच होतील असे कपडे घातले होते. तिने या फोटोला नवी सुरुवात नवे फोटो.कॅप्शन दिले आहे.

झिलने तारक मेहता शो पासून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली तिने शिक्षण पूर्ण करण्यासाठी  शो सोडला. ती मेकअप आर्टिस्ट आहे. ती आईसोबत हा व्यवसाय करते. ती मेकअप आर्टिस्ट तर तिची आई हेअर स्टायलिस्ट आहे. तर तिचा होणारा नवरा आदित्य दुबे हा एक व्हिडीओ कन्टेन्ट क्रिएटर आहे. 

Edited By- Priya Dixit