शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (12:20 IST)

तामिळ सुपर स्टार विजयला 1 लाखाचा दंड

तामिळ सुपर स्टार विजय याला उच्च न्यायालयाने फाटकावले आहे आणि त्याला 1 लाखाचा दंड देण्याचे निर्देश दिले आहे.उच्च न्यायालयाने हे दंड त्याला इंग्लडमधून आयात केलेल्या महागड्या कारसाठी दिले आहे.त्याने या कारचा मागील कर देखील भरला नव्हता.
 
विजयच्या या महागड्या कारची किंमत सुमारे 7.95 कोटी एवढी आहे.त्याने या कारचा कर भरला नसून या कारवरील कर माफ करण्यात यावे असे अर्ज सरकारकडे दिले होते.
 
या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून त्याला या महागड्या कारचे कर न भरल्यामुळे 1 लाख दंड देण्यात आला आहे.
 
दंडाची ही संपूर्ण रकम तामिळनाडू मुख्यमंत्री कोव्हीड रिलीफ फंड मध्ये देण्यात येईल असे मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले आहे.