बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2020 (15:01 IST)

'तान्हाजी' चित्रपट करमुक्त झाला

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रेक्षकांना सवलतीच्या दरात हा चित्रपट पाहता येईल. तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा मोहीमेवर आधारित असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
 
कलाकारांचा दमदार अभिनय आणि अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या साहसी दृश्यांमुळे 'तान्हाजी' चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. आतापर्यंत हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता.
 
काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यात तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती.