1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जानेवारी 2020 (10:23 IST)

'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' ची जोरदार कमाई सुरूच

'Tanhaji - The Unsung Warrior' continues to generate huge revenue
'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'  चित्रपटाच्या कमाईचे आकडे रोज वाढत आहेत. सध्या तरी या चित्रपटाच्या स्पर्धेमध्ये आणखी कोणताही चित्रपट नाही. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर ठेवले आहेत. या शर्यतीत 'तान्हाजी' एकच स्पर्धक असल्याचं आदर्श यांनी ट्विट करत सांगितलं. नवव्या दिवशी या चित्रपटाने १६.३६ कोटी रुपये इतकी कमाई केली. आतापर्यंत 'तान्हाजी'च्या कमाईचे एकूण आकडे हे १४५.३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत, असं या ट्विटमधून सांगण्यात आलं. 
 
मुख्य म्हणजे कमाईच्या आकड्यांचा वेग असाच राहिला तर, या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचा एकूण गल्ला १५० कोटींच्या घरात सहज पोहोचू शकणार आहे.