बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

वरूण धवन दिसणार 'मिस्टर लेले' मध्ये

बॉलिवूड अभिनेत्री वरूण धवनच्या आणखी एका चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'मिस्टर लेले' असे त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटात वरूण मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण जोहर यांचे आहे. तर करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित केला.

या पोस्टरमध्ये वरूण अंडरवेअरवरमध्ये दिसत आहे. तर त्याच्या हातात रिव्हॉल्वर आणि कमरेला फॅनी पॅक बांधलेला आहे. १ जानेवारी २०२१ रोजी 'मिस्टर लेले' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटाचे लेखन शशांक खेतानने केले आहे.