गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (11:14 IST)

तापसी पन्नू म्हणजे निडर शेरनीः दिया मिर्झा

Tapasi Pannu is the fearless lioness: Dia Mirza
गेल्या वर्षी गेम ओव्हर, मिशन मंगल आणि सांडकी आंख सारख्या सिनेमातून चमकलेल्या तापसी पन्नूला एक नवीन टोपणनाव मिळाले आहे. निडर शेरनी असे टोपणनाव तिला मिळाले आहे. तापसीचा आगामी सिनेमा थप्पडची निर्माती दिया मिर्झाने तापसीला हे टोपणनाव दिले आहे. थप्पड ही एका विवाहित स्त्रीची कथा आहे. पतीकडून एक दिवस थप्पड खावी लागल्यानंतर स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय या नायिकेने घेतला आहे. हा अनुभव स्वतः दिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वीच घेतला आहे. 
 
पतीशी न पटल्यामुळे काही कहिन्यांपासून ती वेगळी राहते आहे. दिया मिर्झाने अ‍ॅक्टिंग थांबवून बरेच दिवस झाले आहेत आणि ती निर्मितिच्या क्षेत्रात सक्रिय आहे. थप्पडमधील तापसीने आपल्या अपेक्षेप्रमाणेच ही व्यक्तिरेखा साकारली आहे, असे दिया म्हणाली. तापसीने ज्या धैर्याने कौटुंबिक समस्येला सामोरी जाणारी महिला साकारली आहे, ते पाहून तिला निडर शेरनी म्हणावेसे वाटते, असे दिया म्हणाली. सत्यस्थितीला पडद्यावर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. लोकांना विचार करायला भाग पाडले पाहिजे आणि त्यातून काही सकारात्मक निष्कर्ष काढता आला पाहिजे, असेही तिने सांगितले.