testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

उलटा चष्माचे लेखक मेहता यांचे निधन

tarak mehta ulta chashma
Last Modified बुधवार, 1 मार्च 2017 (15:28 IST)
प्रसिद्ध विनोदी लेखक,स्तंभलेखक,नाटककार तारक मेहता यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे
ते 87 वर्षांचे होते. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका त्यांच्या काॅलमवरून 2008पासून सब टीव्हीनं ने
सुरू केली आणि ती तुफान लोकप्रिय आहे. महेता यांनी लिखित असलेला गुजराती
‘दुनिया ने उंठा चष्मा’ हा त्यांचा काॅलम प्रसिद्ध होता.चित्रलेखामध्ये 1971पासून
त्यांनी स्तंभलेखनाला सुरुवात केली होती.त्यांनी अनेक नाटकांची भाषांतरं गुजरातीमध्ये केलीयत. त्यांची 80 पुस्तकं प्रसिद्ध झालीयत. उपहासात्मक विनोदी शैलीमुळे वाचकांमध्ये ते लोकप्रिय होते. पद्मश्री पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना सिरीयल आणि नाट्य, लेखन क्षेत्रातील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


यावर अधिक वाचा :