1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 सप्टेंबर 2018 (09:30 IST)

3 सप्टेंबरपासून ‘कौन बनेगा करोडपती’चे दहावे पर्व

The tenth festival of Kaun Banega Crorepati
‘कौन बनेगा करोडपती’चे दहावे पर्व घेऊन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन येत्या 3 सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर हा शो सुरू होत आहे.‘कब तक रोकोगे’अशी यंदाची थीम असणार आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या जीवनातील कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपले स्वप्न साकार करण्यासाठी चिकाटीने तग धरलेला असतो. हे अभियान केबीसीच्या प्रत्येक होतकरू स्पर्धकाच्या भावनांना हात घालते. 
 
या वर्षी या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी फक्त 15 दिवसांच्या कालावधीत तब्बल 31 मिलियनपेक्षा जास्त लोकानी नोंदणी केली होती. यंदाच्या वर्षी ‘आस्क द एक्स्पर्ट’ही लाइफलाइन पुन्हा समाविष्ट करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक शुक्रवारी या कार्यक्रमात‘केबीसी कर्मवीर’चे आयोजन होईल.