सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (12:35 IST)

देशात मूर्खांची कमी नाही : स्वरा भास्कर

देशात कोरोनाचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा जीव गेला आहे.
 
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विविध राज्यात कडक निर्बंध लागू करणत आले आहेत. मात्र काही ठिकाणी त्यांच पालन होत नसल्याचं चित्र दिसत आहे. उत्तर प्रदेशातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बदायूँ जिल्ह्यात मुस्लीम धर्मगुरुंच अंत्ययात्रेसाठी प्रचंड गर्दी करण्यात आलचं समोर आलं आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने संताप व्यक्त  केला आहे.
 
स्वराने एक ट्विट रिट्विट केलं आहे. मुस्लीम धर्मगुरू हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाउन असतानाही लोकांनी गर्दी केली आहे. हा व्हिडिओ रिट्विट करत या देशात मूर्ख लोकांची कमी नाही, असे ट्विट करत स्वराने संताप व्यक्त केला आहे. स्वरा भास्कर राजकीय भूमिका घेऊन तिची मते मांडत असते. अनेकवेळा ती वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. स्वराने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हारल झाले आहे.