1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (13:01 IST)

सिद्धार्थ शुक्लाने जेव्हा पियक्कडच्या भूमिकेसाठी अशी केली होती तयारी

This is what Siddharth Shukla did when he was preparing for the role of sharabi
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे मनोरंजन जगातच नव्हे तर त्याचे चाहते आणि इतर इंडस्ट्रीचे लोक देखील दु:खी आणि हैराण आहे. केवळ वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचं या प्रकारे जगाला निरोप देणं धक्कादायक आहे. तो खूप फिट होता आणि आपल्या आरोग्याप्रती जागरुक देखील.
 
सिद्धार्थ शुक्लाने वेब सीरीज 'ब्रोकन बट ब्यूटीफुल 3' याने डिजिटल डेब्यू केलं होतं. सीरीजमध्ये सिद्धार्थला अगस्त्य च्या भूमिकेत पसंत केलं गेलं. सिद्धार्थच्या भूमिकेला एक जुनूनी प्रियकर होण्यासह सिगारेट आणि दारु पिताना दाखवलं गेलं होतं.
 
सिद्धार्थ शुक्लाने अलीकडेच सांगितले होते की कशा प्रकारे त्याने पहिल्यांदा नशेत असल्याचं शूट केलं होतं. नशेत धुत्त असलेल्या दृश्याची शूटिंगचं अनुभव आठवत सिद्धार्थने म्हटलं होतं की मी आधी कधीच नशेत असल्याचं दृश्य केलं नव्हतं म्हणून मला हे कशा प्रकार पार पडेल विश्वासच नव्हता. हे अवघड आहे आणि मला वाटलं की मी अभिनेता म्हणून खूप प्रयत्न करत होतो. मला याबद्दल थट्टा करणे आणि हसणं चांगलचं लक्षात आहे आणि नंतर यासाठी सीरियस व्हावं लागायचं.
 
खरं तर, ज्या दिवशी मला नशेत दृश्याची शूटिंग कराचयी होती त्यादिवशी सेटवर मला भेटण्यासाठी पाहुणे आले होते. मला आपल्या केरैक्टरमध्ये राहयचं होते आणि ते व्यवस्थित शूट करायचे होते. मी असा व्यवहार करायला सुरु केला जसं की मी नशेत आहे- आपल्या वॅनिटी वॅन ते सेट पर्यंत मी एका खास प्रकारे चालून आलो आणि भेटायला आलेले आपसात माझ्या नशेत असल्याबद्दल चर्चा करु लागले आणि माझ्यासाठी काळजी घेत होते. पण नंतर मी सांगितले की मी सीनची तयार करत होतं आणि काळजीसारखी बाब नाही.
 
सिद्धार्थने दर्शवून दिले की अभिनेता म्हणून ते आपल्या एक्टिंगबद्दल कितपत सीरियस होते. सिद्धार्थ खतरों के खिलाड़ी आणि बिग बॉस शो चे विनर देखील होते. त्यांची प्रसिद्धी एखाद्या फिल्म स्टारपेक्षा कमी नव्हती.