शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (11:49 IST)

कतरिनाच्या हातावर लागणार विकीच्या नावाची ही खास मेहंदी ! किंमत कळल्यावर धक्काच बसेल

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या जोडप्याच्या लग्नाबाबत जवळपास सर्वच प्रकारची माहिती समोर आली होती, मात्र आता समोर आलेले अपडेट जाणून सर्वानाच धक्का बसेल.  कतरिना कैफने लग्नासाठी राजस्थानची प्रसिद्ध मेहंदी ऑर्डर केली आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये सांगितली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  लग्नाच्या वेळी कतरिना कैफच्या हातावर लागणारी मेहंदी खूप खास असेल. ही मेहंदी कतरिना कैफने पाली (राजस्थान) येथून मागवली आहे. राजस्थानच्या सोजत जिल्ह्यातील मेहंदीला हेना म्हणून ओळखले जाते आणि त्याची चमक खूप खास आहे. ही मेहंदी तिच्या खास वैशिष्ट्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. कतरिना कैफसाठी सोजतचे कारागीर स्वतःच्या हातांनी मेहंदी तयार करत आहेत. त्यात कोणतेही रसायन असणार नाही. कतरिनाला मेहंदीचा नमुना पाठवण्यात आला होता, जो तिने पास केला आहे. या मेहंदीची किंमत 50 हजार ते 1 लाख रुपये इतकी आहे. मात्र, या बातमीबाबत विकी आणि कतरिनाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.