रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 नोव्हेंबर 2018 (00:27 IST)

ठग्स ऑफहिंदोस्तानचे चित्रीकरण झाले घनदाट जंगलात

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. साहजिकच या चित्रपटाबद्दलची एकही बतमी प्रेक्षक चुकवू इच्छित नाहीत. अशात ठग्स ऑफ हिंदोस्तानचा मेकिंग व्हिडिओ चुकवण्याचा तर प्रश्र्नच नव्हता. 
 
दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्‍या ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला असून या व्हिडिओला प्रेक्षकांचा खूपच छान प्रतिसाद ळित आहे. हा मेकिंग व्हिडिओ पाहिल्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण कोणत्या परिस्थितीत करण्यात आले याची कल्पना आपल्याला येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एका घनदाट जंगलात करण्यात आलेले आहे. या जंगलात चित्रीकरण करणे हे चित्रपटाच्या टीमसाठी खूपच कठीण होते. त्यांना चित्रीकरण करताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. 
 
ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडधील माल्टा या परिसरात झालेले आहे. माल्टा हे अतिशय घनदाट जंगल असून या जंगलात अनेक विषारी साप आहेत. या चित्रपटाचे लोकेशन पाहून अमिताभ बच्चन यांना देखील आश्चर्य वाटले होते. कारण माल्टा येथील या चित्रपटाच्या लोकेशनवर पोहोचल्यावर त्यांना एक महाकाय गुंफा तिथे दिसली होती. ही गुंफा एखाद्या उंच इमारती प्रमाणेच होती. या गुंफेच्या अवतीभवती या चित्रपटातील अनेक दृश्याचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. 
 
या चित्रपटाचे लोकेशन हे आड वळणावर असल्याने तिथे पोहोचणेदेखील चित्रपटाच्या टीमसाठी कठीण होते. या लोकेशनवर जाण्यासाठी पायी चालावे लागत असल्याने अमिताभ बच्चन यांना अनेकवेळा श्र्वसनाचा त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांना या सेटवर पालखीतून नेले जायचे.