गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (12:41 IST)

'टायगर जिंदा है'... सलमानचा नवा विक्रम

tiger jinda hai salman khan katrina kaif
नाताळच्या पार्श्र्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. यामुळे 2017 संपता संपता सलमान खानने आपल्याच कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सलमान-कतरिनाच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटानेगेल्या तीन दिवसात तब्बल 114 कोटींची कमाई केली आहे.
 
सर्वाधिक कमाई करणारा सलमान खानचा हा 12वा चित्रपट आहे. या चित्रपटाने देशातच 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सलमानने स्पर्धेतील इतर अभिनेत्यांनाही मागे टाकले आहे, असे ट्विट चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी केले आहे.
 
सलमानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाने देशात सर्वाधिक 320.4 कोटी तर 'सुलतान' चित्रपटाने 300.45 कोटींची कमाई केली होती. आता सलमानचा 'टायगर जिंदा है' चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरू आहे. रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होताच या चित्रपटाने 34 कोटींची कमाई केली. प्रदर्शनावेळी सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला हा चौथा हिट चित्रपट ठरला आहे.