सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 17 मार्च 2020 (17:19 IST)

टायगरचा डायलॉग वादग्रस्त?

अभिनेता टायगर श्रॉफ हा बागी 3 या चित्रपटामध्ये सीरियाचे नामोनिशाण नकाशावरून संपुष्टात आणण्यासाठी सिद्ध झाला आहे. त्याच्या या संबंधातील संवादाला केवळ चित्रपटाच्या कथेच्या संबंधात पाहायला हवे, असे सांगत त्याने सांगितले की, आपला भाऊ रितेश देशुख याला दहशतवाद्यांनी पळवले असून, त्याला सोडवून आणण्यासाठी सीरियाला जातो, तेथे एका माणसाविरुद्ध सारा देश असा संघर्षच जणू उभा केला आहे, तशा प्रकारचे व तशा आशयाचे ट्रेलर सध्या गाजत आहेत. तुम्ही माझ्या भावाला काही हानी पोहोचवली तर वडिलांची शपथ तुमच्या देशाचे नामोनिशाण जगाच्या नकाशावरून पुसून टाकीन, असे तो सांगतो.
 
या त्याच्या संवादामुळे सोशल मीडियावर टीका होत असून, असा संवाद असंवेदनशील असून अयोग्य आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. मात्र, हे सर्व केवळ एक चित्रपट असून तसे त्याबाबत पाहावयास हवे, असे मत टायगरने व्यक्त केले आहे. रितेश म्हणाला की, जर तुम्ही तुमच्या भावावर वा कुटुंबावर प्रेम करत असाल व एखाद्या देशाने जर त्यांच्या प्राणाला हानिकारक असे काही केले तर तुम्ही नक्कीच त्याला देशाबद्दल असे काही म्हणाल. ही भावना प्रत्येकाच्या मनात असेल असे नाही, ती त्या चित्रपटातील पात्राची भावना आहे. हा चित्रपट अहमद खान यांनी दिग्दर्शित केला असून, श्रद्धा कपूरची यात भूमिका आहे, तर जॅकी श्रॉफ यात टायगर श्रॉफ व रितेश देशुख यांचा पिता दाखवला आहे.