बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘टॉयलेट एक प्रेम कथा’ला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग

वेगळ्या विषयावर आणि  स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रश्न मांडत असलेल्या अभिनेता अक्षय कुमारचा  ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ला पहिल्या दिवशी जोरदार बॉक्स ऑफिस ओपनिंग मिळाली आहे. आजच्या पहिल्या  दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर येत्या शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यादिनाच्या सुट्टीमुळे हा सिनेमा अजून पैसा कमावणार आहे.अक्षयचा  पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा  वर्षातील दुसरा सिनेमा ठरला आहे.
 

यापूर्वी अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी 2 ने पहिल्या दिवशी 13.20 कोटी रुपयांची कमाई केली होती.  अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.