मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (12:42 IST)

'नोटबुक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता सलमान खानच्या प्रोडक्शनखाली तयार होत असलेल्या 'नोटबुक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.  अभिनेता मनिष बहलची मुलगी प्रनूतन बहल 'नोटबुक' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सिनेमात प्रनूतन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात झहीर इक्बाल सुद्धा डेब्यू करणार आहे. सलमान खानने स्वत: सोशल मीडियावर ट्रेलरचे प्रकाशन केले आहे. तर नोटबुक सिनेमाचा ट्रेलर २ मिनीट ५१ सेकंदांचा आहे.  
 
सिनेमात प्रनूतन शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर इक्बाल तिच्या जागी इक्बाल नोकरी साठी रूजू होतो. सिनेमात या दोघांमध्ये असलेले प्रेम संबंध चाहत्यांना अनूभवता येणार आहे. त्याचप्रमाणे काश्मीरच्या प्रश्नांवरही सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. २९ मार्च रोजी सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे.