गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2019 (17:33 IST)

ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर (७९) यांचे  बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दिन्यार यांनी थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत त्यांनी रोशन सिंह सोडीच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. 'तेरी भी चूप मेरी भी चूप', 'कभी इधर कभी उधर', 'दम दमा दम', 'हम सब एक है', 'दो और दो पांच', 'दिल विल प्यार प्यार', 'शुभ मंगल सावधान', 'करिश्मा: एक मेरिकल डेस्टनी', 'हम सब बाराती', 'खिचडी' यांसारख्या शोमध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या. कलाविश्वात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
दिन्यार यांनी टेलिव्हिजनवरील मालिकांसह चित्रपटातही काम केले. 'चोरी चोरी चुपके चुपके', 'खिलाडी', 'बादशाह', 'दरार', '३६ चाइना टाउन' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवले. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी गुजराती मालिकांमध्येही काम केले आहे.