1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (16:00 IST)

सैफच्या सवयीला वैतागली करिना

Don't worry about Saif's habit
अभिनेत्री करिना कपूर खान मागच्या काही दिवसांपासून तिचा रेडिओ शो 'व्हाट वूमन वॉन्ट'मुळे खूप चर्चेत आहे. या कपलच्या लग्नाला 7 वर्षं झाली आहेत मात्र या 7 वर्षांत करिना सैफच्या एका सवयीमुळे खूप वैतागली आहे. एका मुलाखतीत करिनानं या गोष्टीचा खुलासा केला. याशिवाय तिनं तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी काही खुलासे केले. टॉक शो 'द लव लाईफ लाइव्ह शो'मध्ये करिनानं सर्व प्रश्र्नांची उत्तरं दिली. करिना म्हणाली, आम्ही दोघंही खूपच सामाजिक आहोत मात्र आम्हाला फिल्मी पार्ट्या आवडत नाहीत. सैफला कोणत्याही स्क्रिनिंग शोला जाणं आवडत नाही कारण त्याचं म्हणणं आहे की तो खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे सैफ अशा ठिकाणी जाणं कटाक्षानं टाळतो.
 
आम्ही दोघंही या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत. मात्र या ठिकाणी आमचे खूप कमी मित्र आहेत. करिना पुढे म्हणाली, सैफला वाचनाची भयंकर आवड आहे. तो बरच वेळा पुस्तकं वाचत असतो. आमचं रात्रीचं जेवणं नेहमीच लवकर होतं. 7.30 ते 8 वाजेपर्यंत आम्ही जेवतो. मात्र सैफची एक सवय खूपच वैताग आणणारी आहे. जेव्हा मी त्याला कोणतीही गोष्ट सांगते त्यावेळी त्याची पहिली प्रतिक्रिया नाही अशी असते. जेव्हा मी त्याला विचारते, सैफ तुला काय वाटतं आपण प्रत्येक पाऊल ट्राय करुन मगच टाकायला हवं का? त्यावेळी त्याचं उत्तर असतं, 'नाही'.