शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 1 एप्रिल 2015 (10:12 IST)

अंधविश्वासू एकता!

आंधळ्या विश्वासाने वावरणार्‍या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आढळतात. मग बॉलिवूड तरी यापासून लांब कसं राहू शकेल? बॉलिवूडचा दिग्दर्शक-निर्माता असो, की अभिनेता-अभिनेत्री, यशस्वी होण्यासाठी हे सगळेच जण काही ना काही उपाय करत असतात. यासाठी काही काळ का होईना, अंधविश्वासू बनतात. या उपायोजनांत काही वस्तू असतील किंवा बदल हे लोक आपल्यासाठी लकी मानू लागतात. यातीलच एक आहे, एकता कपूर.

प्रसिद्ध आणि यशस्वी होण्यासाठी तीही काही ना काही करत असतेच. एकताच्या याच गोष्टी तिला अंधविश्वासू म्हणून साबीत करतात. अलीकडेच एकताने आपला डेलीसोप 'इतना करो ना मुझे प्यार'च्या शीर्षकात ये कैसा अनुरोध असं उपशीर्षक जोडलं आहे. असं करण्यामागे अध्यात्म आणि अंकज्योतिष हे कारण असलचं एकता सांगते.

बॉलिवूड सूत्रांच्या मते, एकता काही दिवसांपूर्वी अमृतसर येथील सुवर्णमंदिरात दर्शनासाठी गेली होती आणि तिथून परतल्यानंतरच तिने 'इतना करो ना मुझे प्यार'च्या शीर्षकात ये कैसा अनुरोध हे उपशीर्षक जोडण्याचा निर्णय घेतला. सोनी चॅनेलवरून प्रसारित होणार्‍या या सीरिअलमधील मुख्य भूमिकेत रोनित रॉय आणि पल्लवी कुलकर्णी आहेत.