शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑगस्ट 2014 (15:59 IST)

अपघात आणि क्लिक क्लिक आता माझी सटकली!

‘सिंघम’फेम अभिनेते प्रकाश राज यांच्या गाडीला हैदराबादमध्ये अपघात झाला.. पण, धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी उपस्थितांनी त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो काढणेच पसंत केले. साईबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज माधोपूरमध्ये शूटिंग संपवून शिलापरामला जाण्यासाठी निघालेल्या प्रकाश राज यांची गाडी सिग्नलला थांबली होती. अचानक, मागच्या बाजूने भरधाव आलेल्या एका खासगी बसनं त्यांच्या कारला धडक दिली.

तसंच या बसची एका ऑटोरिक्षालाही धडक बसली. या ऑटोरिक्षात एक महिला आणि एक मुलगी बसलेली होती.. या अपघातात दोघीही जखमी झाल्या. अपघातात प्रकाश राज मात्र सुरक्षित आहेत. या घटनेविषयी प्रकाश राज यांनी ट्विटरवर माहिती दिलीय.. परंतु, अपघाताच्या वेळी लोकांनी दाखवलेल्या उदासीनपणावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. ‘अपघातातून थोडक्यात वाचलो, पण हे खूपच धक्कादायक होतं की तरुण वर्ग लोकांना वाचविण्याऐवजी अपघाताचे फोटो काढत होते’, असं प्रकाश राज यांनी ट्विटरवर म्हटलंय. दरम्यान, बस ड्रायव्हर मल्लारेड्डी याला पोलिसांनी अटक केलीय.