शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 20 जानेवारी 2015 (11:45 IST)

अमिताभ, रजनीकांत आणि कमल हासन दिसणार एकत्र

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन सोबत दिसणार आहेत. हे तिनी दिग्गज कुठल्या चित्रपटात नसून एका इवेंटमध्ये सोबत दिसणार आहे. हे अद्भुत दृश्य मंगळवारी मुंबईच्या पंचतारका हॉटेलमध्ये दिसणार आहे, जेथे सिनेमा जगताचे हे तिनी दिग्गज एकत्र मंचावर येणार आहे.  
 
मंगळवारी 20 जानेवारीला मुंबईत अमिताभ बच्चन यांचे येणारे चित्रपट 'शमिताभ'चा म्युझिक लाँच करण्यात येणार आहे. अमिताभ चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, तसेच त्यांच्या बरोबर चित्रपटात धनुष आणि अक्षरा हासनपण आहे. असे म्हटले गेले आहे की अमिताभ, रजनीकांत आणि कमल हासन यांची उपस्थिती मशहूर संगीतकार इल्लैया राजा यांच्या सन्मानात होणार आहे. इल्लैया यांनी 'शमिताभ'चा म्युझिक कंपोज केले आहे.  
 
चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की या इवेंटबद्दल फारच उत्साहित आहे. या म्युझिक लाँचसाठी अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात एक ऑडियो क्लिपसोबत सर्वांना आमंत्रण पाठवले आहे. तसेच धनुष दक्षिण भारतीय चित्रपटाचा स्टार आहे आणि रजनीकांत यांचा जावई आहे, जेव्हा की अक्षरा कमल हासनची धाकटी मुलगी आहे.