शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आता हृतिकसोबत सनीचा रोमान्स!

बॉलीवूडमध्ये आपले हातपाय पसरत चाललेल्या बेबी डॉल सनी लिओन आणि हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी एक गरम बातमी असून ‘काबिल’ या चित्रपटात बॉलीवूडचा मॅचो मॅन हृतिक आणि सनी लिओन पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. 
जॉन अब्राहमच्या ‘शूटआउट अँट वडाला’ चित्रपटात ‘लैला’ हे आयटम साँग केलेली सनी आता हृतिक रोशनच्या ‘काबिल’ चित्रपटातही हॉट आयटम साँग करणार आहे. हृतिकचे वडील राकेश रोशन मुलाला घेऊन दोन चित्रपट बनवणार आहेत. यापैकी एका चित्रपटाचे ते स्वत: दिग्दर्शन करणार असून दुसरा चित्रपट संजय गुप्ता दिग्दर्शन करणार आहे. 
 
पहिल्यांदा संजय गुप्ताच्या ‘काबिल’ चित्रपटाचे काम सुरू होईल. यात सनी लिओनचे हृतिकसोबत आयटम साँग असेल.