1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2015 (10:16 IST)

आलिया करिनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा..

स्वत:ला करिनाची फॅन म्हणवून घेणार्‍या आलिया भट्टने आता करिनाला कॉपी करण्याचाही प्रयत्न केलाय. तसे पाहायला गेले तर करन जोहरच्या ‘स्टुडंस ऑफ द ईअर’मधून सिनेसृष्टीत प्रवेश केलेल्या आलियाने लवकरच आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. 
 
पण, तिला करिनाचे रोल्स आणि तिची अँक्टिंग मात्र खूप आवडते, असे आलिया स्वत: म्हणते. म्हणूनच की काय, एका डबस्मॅशमध्ये आलियाने करिनाचा डायलॉग म्हटलाय.. ‘जब वी मेट’ या सिनेमातील एक डायलॉग आलिया म्हणताना दिसतेय.