शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 19 एप्रिल 2014 (15:43 IST)

आलियाचे कौतुक

आलियाचा 'टू स्टेटस' रिलीज झाला. या चित्रपटामुळे आलियाला आणखी एक जवळची व्यक्ती मिळाली. नाही... नाही. अर्जून कपूर नव्हे तर या चित्रपटात तिच्या आईचं काम करणार्‍या रेवतीबरोबर आलियाची केमेस्ट्री जमली. या अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणते, या चित्रपटाचं शूटिंग संपेपर्यंत माझ्यात आणि त्यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं. एखाद्या सिनमध्ये ती माझ्या चेहर्‍याला ज्या पध्दतीने स्पर्श करायची त्यामुळे ती खरेच माझी आई वाटायची. तिच्यासोबत काम करुन मीही अभिनय करायला शिकले. ती संवाद बोलताना नुसते शब्द उच्चारत नाही तर तिचा चेहरा त्याहून बरंच बोलतो. त्यामुळे असं मला वाटलं की ती माझी आईच आहे. माझ्या चेहर्‍यावर ज्या काही इमोशन्स दिसतील त्या तिच्यामुळे.