शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 13 जून 2016 (10:48 IST)

'उडता पंजाब'ला 'ए' सर्टिफिकेट?

सेन्सॉर बोर्डाने 'उडता पंजाब' या चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट दिल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.  ' सेन्सॉर बोर्डाच्या ९ सदस्यांनी हा चित्रपट पाहिला असून सर्वांनी मिळून या चित्रपटातील १३ दृश्यांना कात्री लावत चित्रपट 'ए'सर्टिफिकेट देऊन तो (प्रदर्शनासाठी) पास केला आहे' असे महलानी यांनी सांगितल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

दरम्यान  शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाबप्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या दृष्यकपातीवर चांगलेच ताशेरे ओढले. ' तुमचं काम प्रमाणपत्र देण्याचं आहे, टिव्ही असो की सिनेमा लोकांना तो पाहू द्या, प्रत्येकाला निवड करण्याचा हक्क आहे' असे सांगत खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभे केले. याप्रकरणी न्यायालय आज (सोमवार) अंतिम निकाल देणार आहे. मात्र त्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाल 'ए' सर्टिफिकेट दिले आहे.