शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 29 एप्रिल 2015 (19:55 IST)

'घायल वंस अगेन’मधून होणार आहे मीनाक्षी शेषाद्रिची वापसी!

सनी देओलला 1990चे आपले सुपर-डूपर हिट 'घायल’चे सीक्वल बनवण्यासाठी फारच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण तो  इंडस्ट्रीमध्ये कुणाचीही मदत न घेता चित्रपट पूर्ण करण्यात लागला आहे. निर्देशनपण स्वत:च करत आहे. तो प्रेक्षकांसाठी सरप्राइजपण आणत आहे.  
 
यापेक्षा मोठे सरप्राइज काय असेल की चित्रपटासाठी मीनाक्षी शेषाद्रि यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सह-निर्माता सुनील सैनीने एका  फिल्म पोर्टलशी बोलताना याचे पुष्टीकरण केले आहे.    
 
त्यांनी म्हटले आहे की मीनाक्षीला "घायल वंस अगेन’चा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आणि आता तिच्या बाजूने उत्तर येण्याची प्रतीक्षा करत आहोत. सनीसोबत मीनाक्षीचे "घायल’, "दामिनी’, "घातक’ सारखे चित्रपट यशस्वी ठरले. "घातक’नंतर ती इंडस्ट्री सोडून नवर्‍यासोबत  अमेरिकेत स्थायिक झाली आहे.