शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जुलै 2014 (16:40 IST)

'ज्युनियर जॅक्सन'ला चार लाख हिट

एक दिवसात फेसबुकवर चार लाख हिट्स. कुठल्या सेलेब्रिटीसाठी हे करणे काही मोठे काम नाही आहे. पण एका सात वर्षाच्या मुलाच्या व्हिडिओला जेव्हा एवढे जास्त लोकं पसंत करतात तेव्हा त्यात नक्कीच काही खास असेल.  
 
मुंबईत राहणारा गौरांश चौहान आता 11 वर्षाचा आहे आणि 4 वर्ष अगोतर हा व्हिडिओ जेव्हा फेसबुकवर अपलोड केला तेव्हा या व्हिडिओने लोकांना आश्चर्यचकित केले. याला बघून लोकांनी गौरांशला 'ज्युनियर मायकल जॅक्सन' म्हटले. 
   
रिऍलिटी शोमध्ये रिजेक्ट : गौरांश चार वर्ष आधी आपली प्रतिभा दाखवण्यासाठी डांस रिऍलिटी शो डांस इंडिया डांसमध्ये ही गेला होता. तेथे त्याची कला बघून रेमो डिसूजा, टेरेंस आणि गीता कपूर सारखे परीक्षक फारच प्रभावित झाले, पण वय कमी असल्याने तो त्या शोमध्ये भाग घेऊ शकला नाही.  
 
चित्रपटात काम : प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजाने देखील गौरांशचा डांस बघितला. तो म्हणाला 'ह्या मुलावर ईश्वराची कृपा आहे.' मी या मुलासोबत चित्रपट एबीसीडी-2मध्ये काम करीत आहे.   
 
गौरांशच्या वडिलांचे म्हणणे आहे की जेव्हा त्याचा व्हिडिओ मायकल जॅक्सनच्या आधिकारिक फॅन पेजवर अपलोड केला तेव्हा त्यांना   असे वाटले नव्हते की लोक त्याला एवढे पसंत करतील. गौरांशला एक बॉलीवूड चित्रपट व एक यूरोपियन शो ही मिळाला आहे.