1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (10:04 IST)

टायगरला व्हायचं रजनीकांतसारखा सुपरहिरो

नुकताच अभिनेता टायगर श्रॉफचा ‘फ्लाइंग जट’हा चित्रपट प्रदर्शित झाला असून एका वृत्तपत्राला या पाश्र्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत लहानपणापासून सुपरहिरो होण्याची इच्छा असल्याचे मत त्याने व्यक्त केले. ती इच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. टायगरच्या या इच्छेशिवाय त्याला रजनीकांतप्रमाणे सुपरहिरो बनायचे आहे. रजनीकांतच्या चित्रपटाची घोषणा झाली की, प्रेक्षक ज्याप्रमाणे चित्रपटगृहांवर तुटून पडतात तसे माझ्या चित्रपटांबाबत घडावे. 
 
चित्रपट निर्मितीपेक्षाही त्याच्या प्रमोशनसाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. प्रमोशनच्यावेळी त्याच त्याच प्रश्नांची तीच तीच उत्तरे देऊन आम्ही थकून जातो. मला रजनीकांतसारखे बनायचे आहे कारण त्यांना आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्याची गरजच पडत नाही.