शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 16 जून 2016 (14:16 IST)

धमाका: रिलीज होण्याअगोदरच ऋत्विकच्या 'मोहेंजो दारो'ने वसुले 60 कोटी रु.

12 ऑगस्टला बॉलीवूडमध्ये धमाका होणार आहे. ऋत्विक रोशनची 'मोहेंजो दारो' आणि अक्षय कुमारची 'रूस्तम'मध्ये टक्कर होणार आहे. या बद्दल दोन्ही स्टार्सचे चाहते फारच उत्सुक आहे. कोण बाजी मारेल, हे तर रिलीज झाल्यानंतरच माहीत पडेल, पण 'मोहेंजो दारो'ने एक धमाका तर केलाच आहे. या पिरियड ड्रामाने रिलीज होण्याअगोदरच 60 कोटी रुपये वसूल केले आहे.  
कसे वसूल केले 60 कोटी ... पुढील पानावर

या चित्रपटाचे सॅटेलाईट आणि म्युझिक राइट्स 60 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार नुकतेच ही डील झाली आहे. असे म्हटले जात आहे की या चित्रपटाला टीव्हीवर देखील प्रेक्षक बघणे पसंत करतील. म्हणूनच चित्रपटाला एवढे पैसे मिळाले आहे. 'मोहेंजो दारो'मध्ये एआर रहमानचे संगीत आहे म्हणून म्युझिक राइट्सपण उंच किमतीत विकण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्दशन आशुतोष गोवारीकर यांनी केला आहे ज्यांच्यासोबत ऋत्विकने 'जोधा अकबर' केले आहे.
 
काय आहे मोहेंजो दारोची कथा ... पुढील पानावर

सिंधू घाटी सभ्यतेच्या पृष्ठभूमीवर तयार या चित्रपटात ऋत्विक आपल्या वडिलांच्या हत्यार्‍याला शोधताना दिसणार आहे. अॅक्शन दृश्य या चित्रपटाची खासियत आहे. चित्रपटात नवीन हिरॉईन पूजा हेगड़े आहे.