शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 15 एप्रिल 2014 (14:33 IST)

नर्गिसने दिला उदयला नकार

रॉकस्टार आणि ‘मद्रास कॅफे’ची नायिका नर्गिस फखरीने उदय चोप्राचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला आहे. सूत्राच्या सांगण्यानुसार, उदय या नात्याविषयी खूप गंभीर होता. परंतु नर्गिसने या नात्याला कधीच गंभीररीत्या घेतले नाही. तो लग्न करून स्थायिक होण्याच्या विचारात होता, पण तिला आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करायचे असल्याने तिने नकार दिला.

म्हणून पुढील दोन-तीन वर्षांपर्यंत लग्न करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. नर्गिसने अलीकडेच हॉलिवूड दिग्दिर्शित पॉल फीगच्या स्पा सिनेमाचे शूटिंग केले. तिला वाटते की, तिचे वय अद्याप लग्न करण्याइतके झालेले नाही. उदयला तिचा हा निर्णय कदापि आवडलेला नाही. परंतु, त्याने तिच्या निर्णायाचा सन्मान केला आहे. याविषयी नर्गिसचा प्रवक्ता सांगतो, ‘लग्नाविषयी कोणतीही बातचीत झालेली नाही. ती जेव्हा याविषयी निर्णय घेईल तेव्हा सर्वाना सांगेल.’ नर्गिसने जरी उदचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला असला तरी या जोडीला एकत्र वेळ घालवाला आवडतो.