शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2015 (17:47 IST)

पाकिस्तान दुश्मन देश, भारतीयांचे करण्यात येत आहे ब्रेन वॉश : नसीरुद्दीन शहा

भारताचे सदाबहार अभिनेते नसीरुद्दीन शहा यांचे विधान पाकिस्तानच्या न्यूज पोर्टल, वृत्तपत्र व सोशल नेटवर्किंग साईट्स वर पसरलेले  आहे. या विधानात नसीरुद्दीन शहाने म्हटले होते की पाकिस्तानची इमेज दुश्मन देशाच्या रूपात बनवण्यासाठी भारतात ब्रेन वॉशिंग होत आहे.  
 
काही दिवसांअगोदर इंटरटेनमेंट वेबसाइट बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी म्हटले होते की ही फारच दुखद बाब आहे पाकिस्तानच्या एक्टर्सला भारतात परफॉर्म करण्यापासून नेहमीच रोखण्यात येते. नुकतेच अहमदाबादामध्ये पाकिस्तानी आर्टिस्ट येथे तोडफोडीचे प्रकरण समोर आले, ही फारच दुःखद बाब आहे. त्यानंतर ही पाकिस्तानमध्ये आमचे स्वागत फारच चांगल्या पद्धतीने होते.   
 
मी पाकिस्तानला जाणे नेहमीच कायम ठेवीन कारण माझे असे मानणे आहे की तिथल्या लोकांशी संबंध बनवणे फारच गरजेचे आहे. कारण राजकारणात असलेले नेते तर नेहमीच रंग बदल असतात. भारतीयांच्या डोक्याचे ब्रेन वॉश करण्यात येत आहे की पाकिस्तान एक शत्रू देश  आहे. जेव्हा की सत्य असे आहे की लोकांना ऐतिहासिक पृष्ठभूमीबद्दल काही सांगण्यात येत नाही आहे.     
   
नसीरुद्दीन शहा म्हणाले, जेव्हा मी पाकिस्तानात जातो, तेव्हा मी ऐकतो की तेथील 25 टक्के लोकं भारतात विस्थापित झाले आहे, जेव्हाकी येथून फक्त 1 टक्के तेथे गेले आहेत. मला असे माहीत पडले झाले आहे की 1947च्या आधी कराचीमध्ये 95 टक्के लोकं सिंधी बोलत होते, पण 1948मध्ये फक्त 2 टक्के लोकंच सिंधी बोलणारे उरले आहे. हे कळल्यावर फारच वाईट वाटले.  
 
पाकिस्तानात भारतीयांसाठी असलेल्या प्रेमाबद्दल बोलताना शहा म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये जो दुरावा आहे, तो राजनैतिक आहे. हा संपायलाच हवा. जोपर्यंत हा दुरावा संपणार नाही तोपर्यंत आम्ही तिथल्या लोकांशी संवाद साधू शकणार नाही. भारताने जे काही मिळविले आहे त्याबद्दल पाकिस्तानात फार मोठी जिज्ञासा आणि आदर आहे.  
 
नसीरुद्दीन यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, 'पाकिस्तानात ते लोकं मला प्रेम देतात. ते लोकं सलमान आणि शाहरुख खान सारख्या स्टार्सचे दीवाने आहे, पण मी, ओम पुरी आणि फारूख शेख सारख्या ऐक्टर्सला देखील ते प्रेम करतात. मी पाकिस्तानमध्ये जातो तेव्हा मला फारच स्पेशल अनुभव येतो. मला माझ्या पुस्तकाबद्दल पाकिस्तानात ज्याप्रकारे रेस्पॉन्सची उमेद होती, तशी उमेद मला आपल्या भारतात नव्हती.