शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 एप्रिल 2015 (11:58 IST)

प्रीतीच्या आयुष्यात आलंय, ‘कुणीतरी खास’

आयपीएल सिझन 8 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीणबाई प्रीती झिंटाच्या चेहर्‍यावर चमक दिसून आली आहे, यामागे नेमकं काय रहस्य आहे हे तुम्हाला अजून माहीत नसेल.
 
प्रीती झिंटाचं आपला या आधीचा बॉयफ्रेन्ड नेस वाडियासोबत आता ब्रेकअप झाल्याने, ती आता कंटाळली आहे. एवढंच नाही तर तिच्या आयुष्यात आता कुणीतरी खास व्यक्तीदेखील आली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रीती झिंटाने म्हटलं आहे, मी आता एका खास व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये आहे, आता माझ्याकडे स्वत:साठी वेळ आहे. क्रिकेट या विषयात आता राहण्याची माझी गरज नाहीय. नेस वाडियासोबत वादग्रस्त ब्रेकअपनंतर, प्रीती झिंटाचं आता पहिलं स्टेटमेंट आलं आहे. प्रीतीला जेव्हा विचारण्यात आलं नेस वाडियासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर, या रिलेशनशिपमधून तुला बाहेर येणं कठीण होतं का? यावर प्रीती झिंटाने उत्तर दिलं आहे, मला माहीत आहे जीवनात कधी कुठे कसं पुढे जायचं? प्रीती झिंटा लॉस एंजिलिसच्या नेहमी फेर्‍या मारत असते आणि तिचा विशेष व्यक्ती तिथेच असल्याचं सांगण्यात येतंय.