शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (12:52 IST)

फक्त 25 टक्के लिव्हरवर जिवंत आहे अमिताभ बच्चन

सदीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये फार मोठा खुलासा केला आहे की त्यांचे लिव्हर फक्त 25 टक्केच काम करत आहे आणि ते त्यावर जिवंत आहे.   
 
अमिताभ यांनी लिहिले आहे की चित्रपट 'कुली'च्या दरम्यान पोटात झालेल्या जखमीमुळे त्यांच्या लिव्हरवर परिणाम झाला होता. 2004-05मध्ये मला आपले लिव्हर व्यवस्थित काम करत नसल्याचे माहीत पडले. उपचार घेत असताना शरीरात दाखल झालेल्या व्हायरसमुळे माझं लिव्हर खराब झाले.  
 
1983मध्ये चि‍त्रपट 'कुली'च्या एका दृश्याचा चित्रीकरण्याच्या वेळेस विलेन पुनीस इस्सरला फाइटदरम्यान अमिताभ यांच्या पोटावर घुसा मारायचा होता. दृश्याला वास्तविकता प्रदान करण्यासाठी पुनीत जोषमध्ये आले आणि खरचत्याने जोरदार घुसा मारून दिला.  
 
अमिताभ यांना देखील हे माहीत नव्हत की नकली फाइट रिअल फाइटमध्ये बदल होईल. घुसा लागताच अमिताभ खाली पडले आणि पूर्ण फिल्म युनिट सन्न राहिली. कोणी या गोष्टीचा विचारही केला नव्हता की 'कुली' चित्रपटाचा पहिला दिवस, पहिला शॉट एवढा भयानक ठरेल. ही शूटिंग बेंगलुरुपासून 16 किलोमीटर दूर मैसूर रोडावर युनिर्व्हसिटीत होत होती.  
 
पुनीतच्या पोटावर पडलेल्या घुसामुळे त्यांना बेंगलुरुहून मुंबई शिफ्ट करण्यात आले आणि ब्रीच कैंडी दवाखान्यात दाखल करावे लागले. दवाखान्यात हे माहीत पडले की अमिताभ बच्चन यांच्या पोटाच्या आतड्या फाटल्या आहे.     
 
मनमोहन देसाई यांचे हिट चित्रपट 'कुली'चा निर्माण 1983 मध्ये झाला होता आणि तेव्हा जखमी अमिताभ यांचा उपचार ब्रीच कैंडी दवाखान्यात चालला होता. संपूर्ण देश त्यांचे स्वस्थ होण्याची कामना करत होता. उपचार दरम्यान एक खतरनाक व्हायरसने लिव्हरला खराब करणे सुरू केले होते, ज्याची माहिती त्यांना 2004-05 मिळाली.  
 
बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन फक्त 25 टक्के लिव्हरचे काम करत असले तरी आपले जीवन जगत आहे आणि आजही ते फार व्यस्त आहेत. लहान पडद्यापासून मोठ्या पडद्यावर अमिताभचा जादू संपूर्ण जगात पसरलेला आहे.