शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (10:12 IST)

मध्यरात्री ‘बॉयफ्रेंड’ला भेटायला पोहोचली आलिया

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट गुरुवारी मध्यरात्री आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला त्याच्या घरी पोहोचली होती. तिचा हा बॉयफ्रेंड कोण हे तुम्हाला ठाऊक आहे का? अहो, तुम्ही त्याला ओळखता बरं का.. तो एक प्रसिद्ध अभिनेता असून आलियासोबतच त्याने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्याचे नाव आहे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा. 
 
होय, आलिया आणि सिद्धार्थ बॉलीवूडचे नवे कपल आहे. सिद्धार्थची भेट घ्यायला आलिया मध्यरात्री त्याच्या घरी पोहोचली होती. विशेष म्हणजे सिद्धार्थला भेटण्याच्या काही तासांपूर्वीच आलियाने शाहिद कपूरसोबत आपल्या आगामी ‘शानदार’ या सिनेमातील ‘नींद न मुझको आए’ हे गाणे लाँच केले होते. 
 
आलिया आणि सिद्धार्थच्या लिंकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून मीडियात चर्चेत आहेत. मात्र दोघांनीही अद्याप आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. सिद्धार्थ अलीकडेच त्याच्या आगामी ‘बार बार देखो’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतला आहे. अमित त्रिवेदी दिग्दर्शित या सिनेमात कॅटरिना कैफ मेन लीडमध्ये आहे. धर्मा प्रॉडक्शनचा हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होतोय.