शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जुलै 2014 (16:52 IST)

मला बिकिनीची गरज नाही

‘राजा नटवरलाल’ या आपल्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा.र्‍या पाकिस्तानी माडेल हुमैमा मलिकने आपण चांगली अभिनेत्री आहोत त्यामुळे बिकिनी परिधान करून लक्ष वेधून घेण्याची गरज वाटत नसल्याचे म्हटले आहे. अभिनेता इमरान हाश्मीसोबत ‘राजा नटवरलाल’मध्ये हुमैमाने चुंबनदृश्ये दिली आहेत मात्र, चित्रपटात बिकिनी घालण्याची गरज नसल्याचे विधान हुमैमाने केले. ती म्हणाली की, मला चित्रपटात बिकिनी घालावी लागेल असे वाटत नाही. मी चांगली अभिनेत्री आहे मग, बिकिनी घालण्याची गरजच नाही. चित्रपटात कोणतीही रोमँटिक दृश्ये जबरदस्तीने समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. प्रत्येक रोमँटिक दृश्यांना चित्रपटातील प्रसंगानुरूप अर्थ आहे आणि ती समंजसपणे चित्रित करण्यात आली आहेत की, ज्यांना अश्लीलतेची अजिबात किनार नाही. असेही ती पुढे म्हणाली.
 
तसेच चित्रपटात अभिनेत्रीने दिलेल्या चुंबनदृश्यांच्या आधारावर तिच्या अभिनयाची पारख करणे चुकीचे असल्याचे हुमैमा म्हणाली. इथल्या संस्कृतीत फरक आहे याची कल्पना मला आहे त्यामुळे थोडीफार नर्व्हस होते. परंतु, इमरानसारखा सहकलाकार मिळाल्याने दडपण दूर झाल्याचेही ती म्हणाली.