शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

मल्लिका शेरावत आता डोलणार

IFMIFM
सेक्सी मल्लिका शेरावत ज्या चित्रपटात सध्या काम करत आहे त्या चित्रपटाचे नांव गेल्या अनेक दिवसांपासून शोधले जात आहे. निर्माता विक्रम सिंह आणि गोविंद मेनन यांना अखेर चित्रपटाचे नाव मिळालेच. या चित्रपटाचे नाव ‘हिस्स’ असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये मल्लिका नागिणीच्या भूमिकेत आहे.

बदला घेणारी नागिणी अशी या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये मल्लिकाबरोबर इरफान खान आहे. रूप बदलणा-या नागिणीच्या भूमिकेतील मल्लिका वेळ पडल्यावर रूप बदलणा-या नागिणीची भूमिका तिने केली आहे. ती प्रियकराच्या शोधात आहे. चित्रपटात अनेक खून आणि भयावह दृश्ये दाखविण्यात आली आहेत.

मल्लिकाच्या मेकअपवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. तिच्या मेकअपसाठी तासनतास लागायचे. मेकअप झाल्यानंतर ती काहीच खाऊ शकत नव्हती. आपण घेतलेली ही मेहनत वाया जाणार नाही,असे तिला वाटते. प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड लिंचची कन्या जेनिफर लिंच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित होणार आहे.