शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (15:55 IST)

मेरीच्या जन्मगावी नाही दिसणार ‘मेरी कोम’?

येत्या पाच सप्टेंबरला संपूर्ण देशात पाचवेळा जगज्जेती ठरलेली आणि लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित मेरी कोम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण जिच्यावर आधारित हा चित्रपट आहे तिच्याच जन्मगावी म्हणजेच मणिपूरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याची चर्चा आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर उमंग कुमार यांनी दिग्दर्शन केले आहे.
 
या चित्रपटात प्रियंकासोबतच सुनील थापा, दर्शन कुमार, शिशिर शर्मा यांच्याही भूमिका आहेत. मणिपूरमध्ये 2000 पासून हिंदी चित्रपट आणि कार्यक्रम दाखवण्यावर बंदी आहे. या बंदीमुळेच मेरी कोमचा हा चित्रपट मणिपूरमध्ये दाखवण्यात येणार नसल्याची चर्चा आहे.