1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 31 जुलै 2014 (17:27 IST)

मॉडेल बलात्कारप्रकरणी पूनम पांडेची चौकशी होणार?

मुंबईचे डीआयजी सुनील पारस्कर हे एका मॉडेलवरील बलात्कारप्रकरणी अडचणीत सापडले आहे. दुसरीकडे, मुंबई क्राईम ब्रान्च याप्रकरणी किंगफिशर मॉडेल पूनम पांडे हिला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्कर यांनी हे कृष्‍णकृत्य केल्याचे पीडित मॉडेल पोलिसांना सांगितले आहे.
 
पीडीतेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, पूनम पांडे आणि तिच्यात स्पर्धा होती. त्यावरून पूनमने ही कारस्थान घडवून आणल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. यावरून पूनम पांडेही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पूनम पांडेची आता पोलिसांसमोर परेड करावी लागणार आहे. पूनम पांडे आणि डीआयजी यांचे जवळचे संबंध असून पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्करने आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडीत मॉडेलचा आरोप आहे.