शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

''रजनीकांतला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या''

मुंबई- शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सुपरस्टार रजनीकांत हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी जोरदार मागणी धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी आज विधानसभेत केली.
 
विधानसभेत आमदार अनिल गोटे यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत अभिनेते रजनीकांतला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची मागणी केली. मराठमोळ्या रजनीकांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर दक्षिणेतील चित्रपटात मिळवलेले यश अङ्खलातून असेच आहे, असे गोटे म्हणाले. रजनीकांतच्या चित्रपटाला देशभरातून मिळणारा प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा असाच आहे. रजनीकांत महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देवून गौरव करावा तसेच त्यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणीही अनिल गोटे यांनी सभागृहात केली.
 
दरम्यान, रजनीकांतचा ‘कबाली’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 250 कोटींची कमाई केली आहे. ‘कबाली’ चित्रपट पाहण्यासाठी बंगळुरू, चेन्नई, तमिळनाडू येथे सुटी जाहीर करण्यात आली होती.