शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (11:23 IST)

विद्या बालनच्या साडीवरून राजकारण

आता उत्तर प्रदेशात अखिलेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेची ब्रँड अँम्बेसिडर अभिनेत्री विद्या बालन हिच्या साडीवरुन वाद सुरु झाला असून विद्या बालनच्या साडीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत आरोप केला आहे की, विद्या बालनने सरकारी जाहिरातींमध्ये समाजवादी पक्षाच्या झेंडय़ाच्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि समाजवादी पक्ष सरकारी पैशांनी पक्षाचा प्रचार करत आहे.
 
अखिलेश सरकारने प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला समाजवादी पेन्शन योजनेची ब्रँड अँम्बेसिडर बनवले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एकदा खंत व्यक्त केली होती की, समाजवादी पक्षाने काम खूप केले आहे. मात्र, त्या कामांचा प्रचार केला नाही. त्यानंतर योजनेची जाहिरात करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्या बालनला लोक ओळखतात आणि त्यामुळे तिच्या माध्यमातून सरकारची कामेही लोकांपर्यंत पोहोचवता येतील. यातूनच विद्या बालनला योजनेची ब्रँड अँम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेच्या जाहिरातीत जी साडी परिधान केली आहे, त्या साडीचा रंग लाल आणि हिरवा आहे आणि हे रंग समाजवादी पक्षाच्या झेंडय़ाचे आहेत. त्यामुळे अखिलेश यादव आपल्या सरकारी पैशाने पक्षाचा प्रचार करत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, मंत्री रविदास मेहरोत्रा यांनी या आरोपांवर कोणत्याही रंगाची साडी कुणीही परिधान करु शकतो, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यानंतर रविदास म्हणाले, समाजवादी पक्षाचे सरकार आणि योजनाही समाजवादी पक्षाच्या सरकारने आणली आहे. तर नावही.