शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (14:43 IST)

विराट-अनुष्का लवकरच सिनेमात दिसणार?

स्टार फलंदाज विराट कोहली याने पत्रकार परिषदेत अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर कबुली दिल्यानंतर ते लवकरच एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आता सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यशराज फिल्मच्या आगामी सिनेमासाठी विराट कोहलीला विचारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विराटलाही ही ऑफर इंटरेस्टिंग वाटली आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट त्याची गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्मा दिसणार असल्याचं कळतं. विराट आणि अनुष्का यांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं आणि त्यानंतरच दोघांमध्ये प्रेमाचं नात खुललं. हे दोघेही एकत्र चांगले दिसतात आणि चाहत्यांनाही त्यांची केमिस्ट्री आवडते. निर्माता आदित्य चोप्रा क्रिकेटवर एक सिनेमा बनवण्याच्या विचारात आहेत. या सिनेमात अनुष्का आणि विराट यांनी एकत्र काम करावं, अशी त्यांची इच्छा आहे. मुख्य म्हणजे राणी मुखर्जी या सिनेमाची निर्मिती करणार आहे. राणीने या चित्रपटासाठी विराटला संपर्क केला असता, अंतिम निर्णय घेण्यासाठी एप्रिल 2015 पर्यंतचा वेळ मागितला आहे. यशराज फिल्म क्रिकेटवर दोन चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दुसर्‍या सिनेमात आदित्य रॉय कपूरची निवड केली जाण्याची शक्यता आहे.